मुंबई : वाढीव वीजबिलांबाबत शाहनिशा करण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार यांनी म्हटले आहे. वाढीव वीजबिल कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला तेवढ्याच बिलाबाबत सरसकट धोरण आखता येईल का, याचा अभ्यास करायला हवा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
कोरोना काळात वीजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चार पट नक्कीच झाला नसेल असं रोहित पवारांनी म्हटलंय. ग्राहकांना आलेल्या बीलाचा प्रत्यक्ष वापर कसा झाला याचा रिपोर्ट एमएसईबीने काढलाय का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. याबाबत तसा रिपोर्ट काढण्याबाबत आदेश काढलेत का, असे त्यांनी विचारले आहे. सर्वसामान्य ग्राहकांचा आवाज ऊर्जा मंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे ते म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
