मुंबई : एकीकडे राष्ट्रवादी नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप असताना ड्रग्ज पुरवठा प्रकरणात प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’चा मालक रामकुमार तिवारी याला अटक केल्यानंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना समन्स पाठवलं आहे. समीर खान यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. मुंडे यांच्यावरील आरोपानंतर मलिक यांच्या जावयाला समन्स आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता वाढली आहे.
समीर हे नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती आहेत. समीर खान आणि करण संजानी यांच्यात ‘गुगल पे’च्या माध्यमातून २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. ड्रग्ज पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाला आहे, असा संशय एनसीबीला आहे. याच संदर्भात चौकशीसाठी समीर खान यांना बोलावण्यात आलं आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
