सिंधुदुर्ग : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. स्वप्न पाहणं सोपे असते. पण, स्वप्नपूर्तीसाठी झोप विसरुन काम करणे, हे अधिक धाडसी असते. हे मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी नारायण राणे यांनी असेच धाडस केले आहे. मी त्यांचा संघर्ष जवळून पाहिला आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राणेंचं कौतुक केलं आहे.
महाराष्ट्राचे दबंग नेते म्हणून नारायण राणे यांची ओळख आहे. अनेक लोकं स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं हे सोपं असतं. पण स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरुन ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात, त्यातील नारायण राणे हे एक, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचं कौतुक केलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
