पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडनुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत.दोन्ही पक्षाकडून आपापला उमेदवार जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आज भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचार सभेदरम्यान पंढरपुरात बोलत होते.
बारामतीत डीपॉझिट जप्त झाल्यावर कोणी तिकीट देईल का,पण मला दिले आहे. माझी आमदार होण्याची इच्छा होती ती आता पूर्ण झाली. तशीच इच्छा आता समाधान आवताडे यांची आहे.त्यांची ही इच्छा पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत पूर्ण होईल, असा विश्वास आमदार पडळकर यांनी व्यक्त केला आहे.
पुढे ते म्हणाले,मला चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणविसांनी आमदार केल.ही निवडणूक भारतनाना भालके किवा त्यांच्या कुटुंबविरोधात नसून शेतकरी कष्टकरी जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात आहे. ज्यांनी १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट ठेवले,अशा भ्रष्ट सरकारविरोधात आहे. तसेच भारत नानांना शांती मिळावी असे वाटत असेल तर महाविकास आघाडी सरकारविरोधात मतदान करा असे पडळकर म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस