सदाशिवनगर : श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर ता. माळशिरस जि. सोलापुर या साखर कारखान्याचा सन २o२० -२०२१ चा ४७ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते- पाटील, स.म.शंकरराव मोहिते -पाटील सह. सा.का. लि. शंकरनगरचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते -पाटील यांचे शुभहस्ते मोळी पुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अकलुज मार्केट कमिटीचे अध्यक्ष मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते, शिवामृत दुध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते –पाटील, ,जि.प. सदस्या सौ. शितलदेवी धैर्यशील-मोहिते -पाटील, सौ.ऋतुजादेवी संग्रामसिंह मोहिते -पाटील, जि.प सदस्या स्वरूपाराणी जयसिंह मोहिते -पाटील, माजी सभापती सौ. वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते-पाटील, सभापती सौ शोभाताई साठे , जि.प. सदस्या सौ. संगीता मोठे , सौ. सुनंदा फुले, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते -पाटील, विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते -पाटील, व्हा.चेअरमन मिलिंद कुलकर्णी, बाबाराजे देशमुख, प्रकाश पाटील, संग्राम जहॉगिरदार, बाळासाहेब सरगर, सोपान नारनवर, कर्णवर बापु, राहुल वाघमोडे, मामासाहेब पांढरे, रावसाहेब मगर, बाळासाहेब कर्णवर, भिल्लारे भाऊ अरुण तोडकर सर्व जि.प.सदस्य ,पंचायत समिती सदस्य , मार्कट कमिटी सदस्य ,कारखान्याचे सर्व सभासद ,कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक संचालक, सर्व सरपंच , उपसरपंच , नुतन सदस्य ,कारखान्याचे सर्व कामगार,सर्व पोलिस पाटील उपस्थिती होते.
थकीत सर्व शेतकऱ्यांची बिलं लवकरच दिली जातील. तसेच शंकरनगर कारखान्याप्रमाणे उसाला एफआरपी दर दिला जाईल.
जयसिंह मोहिते पाटील
चेअरमन श्री. शंकर सहकारी साखर कारखाना. लि. शंकरनगर
श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर हा कारखाना शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे आणि राहणार. कोणीही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नये. सर्व शेतकऱ्यांच्या भावनेमुळेच कारखाना सुरू झाला आहे.
श्री. रणजितसिंह मोहिते पाटील
चेअरमन श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस