औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये ३१ मार्चपासून सुरू होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. या घोषणेनंतर औरंगाबाद एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी, जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष सुरु केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून, त्यांची चक्क रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली. त्यामुळे भावनेच्या भरात, कोरोना प्रतिबंधक नियमांचा आणि गंभीर परिस्थितीचा विसर इम्तियाज जलील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना पडल्याचे दिसत आहे.
यावरून मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी इम्तियाज जलील यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. ” एमआयएमच्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमघ्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे” असं मनसे नेते अमेय खोपकरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
तसेचं, “हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे” अशी मागणीही अमेय खोपकर यांनी केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस