कल्याण : कल्याणमध्ये वडवली रेल्वे उड्डाण पुलाचे औपचारीक लोकार्पण रद्द झाल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी या पूलाचे लोकार्पण करुन पूल वाहतुकीसाठी खुला केला होता. रात्री हा पूल बंद करण्यात आला आहे. या पुलाचे काही दिवसात लोकार्पण होणार आहे, अशी घोषणा शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. तसेच, कोणता तरी स्टंट करुन खोडसाळपणा करण्याचं मनसेचे कामच आहे. आयत्या बिळावर नागोबा बनण्याचे काम मनसेने केले आहे, अशी खोचक टिका शिवसेना आमदारांनी मनसे आमदारांवर केली आहे.
शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचे म्हणणे आहे की, वडवली पुलाचे लोकार्पण काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आले. त्याची माहिती सर्व आमदारांना दिली होती. असे असताना मनसेने राजकीय स्टंटबाजी करीत खोडसाळपणा केला आहे.
वडवली पूलाच्या उदघाटनाला पालकमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र काही कारणास्तव हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे मनसेने या पुलाचे उदघाटन केले. एकीकडे डोंबिवलीतील कोपर पुलाच्या गार्डर च्या कामाचा शुभारंभ करत शिवसेनेने पहिला नंबर लावला होता. तर कामाला खप उशीर झाल्याची खंत भाजापाने व्यक्त केली. भाजपा- शिवसेनेमधील कलगीतुरा ताजा असतानाच मनसेने वडवली पुलावरून सेनेला टार्गेट केलं. त्यामुळे एकाअर्थाने मनसेने भाजपाला गुपचूप टाळी देत सेनेची राजकीय कोंडी केली की काय? असा सवाल निर्माण झाला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस