मुंबई : गेल्या अनेक महिन्यापासून सुरु रखडलेली मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची निवडण करण्यात आली असून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड आज जाहीर करण्यात आली आहे.
विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या अध्यक्षपदासाठी वेगवेगळे नेते जोरदार लॉबिंग करत होते. त्यात मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, वर्षा गायकवाड यांचाही समावेश होता. मुंबईतील नेत्यांची दिल्लीत ये-जा वाढली होती. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवा यांनी दिल्लीवारी केली होती. परंतु भाई जगताप यांनी या सर्वावर मात करीत बाजी मारली आहे.
कोण आहेत भाई जगताप?
अशोक जगताप यांची भाई जगताप या नावाने ओळख
भाई जगताप काँग्रेसच्या तिकीटावर विधान परिषद आमदार.
जगताप यांच्या आमदारकीची दुसरी टर्म
