आटपाडी : देशातील चार राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या असून प्रत्येक पक्ष या निवडणुकीत उतरणार आहे. तसेच प्रत्येक पक्ष हा आपल्या पक्षाचा विस्तार करण्याच्या तयारीला लागला आहे. त्यात आरपीआय (आठवले) तर कसा मागे राहील.
आरपीआय (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सुद्धा पक्ष वाढीच्या तयारीला लागले असून त्यांनी उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती व भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांना रिपाइंमध्ये येण्याचे आवाहन केले आहे.
रिपब्लिकन पक्ष हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. त्यामुळे जे लोक स्वतःला आंबेडकरवादी मानतात त्यांनी रिपाइंत आले पाहिजे. माजी मुख्यमंत्री मायावती व भीमआर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी रिपाइंत यावे. बहन मायावती या आरपीआय मध्ये आल्यास त्यांना रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष करू असे रामदास आठवले म्हणाले.
केंद्रीय मंत्री असलेल्या रामदास आठवले यांनी केलेल्या या आवाहनाला माजी मुख्यमंत्री मायावती व भीमआर्मीचे चंद्रशेखर आझाद हे कसे प्रतिसाद देतात व त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात यावरच पुढचे अवलंबून आहे. सध्या तरी रामदास आठवले यांनी मात्र ऐक्यासाठी एक पाऊल मात्र पुढे टाकले आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज