बंगळुरू : भारतीय क्रिकेट टीमचे गुगली मास्टर बीएस चंद्रशेखर यांची तब्येत बिघडली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 75 वर्षांच्या चंद्रशेखर यांना स्ट्रोक आल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
1945 साली जन्मलेल्या चंद्रशेखर यांनी 58 टेस्ट आणि 1 वन-डे मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. या 58 टेस्टमध्ये त्यांनी 2.70 च्या इकॉनॉमी रेटनं 242 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 12 वेळा 4 विकेट्स, 16 वेळा 5 विकेट्स आणि 2 वेळा 10 विकेट्स घेण्याच्या पराक्रमाचा समावेश आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
