नवी दिल्ली : मराठा आरक्षणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे, यावर सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे. सोबतच मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या अंतरिम स्थगितीबाबत देखील राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आपलं मत मांडू शकते.
न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्वमर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसंच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेल्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
