मुंबई : मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली असून, सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षणाच्या अडचणी वाढल्या आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
खरेतर, मराठा आरक्षणाची आत्ताची स्थिती पाहता केवळ सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत आले आहे. ज्या पद्धतीने सरकारकडून पावले उचलली जात आहेत, त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असून, या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचे दिसत आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.
सरकार ठामपणे भूमिका मांडत नाही. प्रत्येक वेळेस नवीन मुद्दे मांडत आहे आणि या दोघांमध्ये प्रचंड मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. सरकारकडून स्थापन करण्यात आलेली कमिटी कुणाशी चर्चा करते, त्यात काय निर्णय केले जातात, हे समजत नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय वाईट पद्धतीने हाताळला जात आहे, असा आरोप फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
