पंढरपूर : भगिरथ ला विजयी करून भारतनानांचे स्वप्न साकार करा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर येथील जाहीर सभेत केला. यावेळी भाजप नेते कल्याणराव काळे यांनी अजित पवार यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश केला.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, मंगळवेढा तालुक्याला पाणी मिळावे म्हणून भारतनाना यांनी मोठे काम केले आहे. आमच्या सरकारच्या काळात मंगळवेढा तालुक्यासाठी पाणी योजना मंजूर केली परंतु फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी या योजनेकडे दुर्लक्ष केले. परंतु आम्ही ही योजना पूर्ण करू असे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले. तर भाजप हा काही ग्रामीण भागात लोकप्रिय पक्ष नसल्याचे सांगत उमेदवार भगिरथ भालके यांना विजयी करण्याचे आवाहन ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले.
यावेळी भाजपचे नेते कल्याणराव काळे यांनी अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस