मुंबई : एकीकडे भाजपकडून हे सरकार लवकरच पडेल, असा दावा वारंवार केला जात आहे. त्यातच आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेस आहे म्हणून हे सरकार आहे, असा थेट इशाराच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्याने तिन्ही पक्षांमधील मतभेद समोर आले आहेत.
काँग्रेस आमदारांना निधी कमी मिळत असल्याच्या तक्रारीवरून नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली. याबाबत सातत्याने काँग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे किमान-समान कार्यक्रमावर उभे राहिलेलं सरकार आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टींची समान वाटणी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने लक्षात घ्यावं, असे त्यांनी सुनावले आहे. तसेच, विधानसभा अध्यक्षपदाची निवड करताना कोणताही वाद होऊ नये अशी भूमिका असल्याचे देखील पटोले म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस