पुणे : महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास महिला आणि बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीतील नेत्यांवर मागील काही दिवसात सातत्याने आरोप होत आहे. तर भाजप नेत्यांकडून देखील हे सरकार लवकरच पडणार असल्याचा दावा वारंवार केला जातो. याच पार्श्वभूमीवर आता यशोमती ठाकूर यांनी हे सरकार 5 वर्ष टिकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, महाविकासआघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करत आहे. उद्धव ठाकरे हे व्यापक विचाराचे असून अतिशय चांगले नेतृत्व आहे. छोट्या-मोठ्या अडचणी येत असतात. त्याला आम्ही घाबरत नाही. आम्ही अतिशय स्थिर आहोत, आमच्यामध्ये सातत्य आहे. त्यामुळे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
