आटपाडी : नेलकरंजी ता. आटपाडी, जि. सांगली येथे श्रीनाथ जकाई त्रेवार्षिक यात्रे निमीत्त भव्य महाडर्बी श्वान शर्यत संपन्न झाल्या. यामध्ये लेंगरे येथील ब्लॅक किंग साई ग्रुप हा प्रथम क्रमांकाच्या अल्टो चा मानकरी ठरला.
खासदार संजय (काका) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राजे ग्रुप व समस्त ग्रामस्थ नेलकरंजी यांच्या वतीने नेलकरंजी येथे श्रीनाथ जाकाई त्रेवार्षिक यात्रे निमीत्त भव्य महाडर्बी श्वान शर्यत संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या प्रथम पुरस्कारासाठी मारुती अल्टो कार, व द्वितीय पारितोषिक बुलेट मोटर सायकल आणि तृतीय पारितोषिक एच.एफ.डिलक्स मोटर सायकल अशी बक्षिस ठेवण्यात आली होती.
सदर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी अल्टो कार ही शशिकांत बाबसो भोसले यांनी दिली होती. तर द्वितीय पारितोषिक आनंदराव भोसले, जयदीप (भैय्या) भोसले, धनराज भोसले यांनी दिले. तसेच राजे ग्रुप व ग्रामस्थांच्या वतीने इतर सात विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिक देण्यात आले.
-
या स्पर्धेतील विजेते क्रमांक
प्रथम क्रमांकाचे विजेते श्वान ब्लॅक किंग साई ग्रुप लेंगरे
द्वितीय विजेते श्वान ऑर्नाल संघर्ष ग्रुप
तृतीय विजेते सायलेंट किलर, सातारा
चतुर्थ विजेते श्वान “चोर कला” सातारा
पाचवे विजेते श्वान “राजधानी एक्सप्रेस” पुसेगाव
सहावे विजेता श्वान “ज्युवेली” मरळी
सातवे विजेते श्वान ब्लॅक किंगव गोल्डन ग्रुप महाराष्ट्र
आठवे विजेते श्वान “रॉयल गर्ल” रॉयल ग्रुप महाराष्ट्र
नववे विजेते श्वान “करंट चित्रे” गुरुदास पंजाब
दहावे विजेते श्वान “कल्लू किट्टा” विलास राठोड
प्रमुख विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेला परिसरातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तसेच मान्यवर उपस्थित होते.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस