पुणे : पुण्यात भाजप खासदार गिरीश बापट यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी बोलताना बापट म्हणाले की, राज्य सरकार लॉकडाऊनचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. मात्र, त्याला आमचा पूर्ण विरोध असणार आहे. साथीचे रोग ही राज्य सरकारची जबाबदारी असते. त्यामुळे राज्य सरकारने पुणे महापालिकेला 500 कोटी रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
गिरीश बापट म्हणाले की, ‘लॉकडाऊन हा अंतीम पर्याय नाही. त्यामुळे लॉकडाऊनला आमचा सक्त विरोध आहे. लॉकडाऊनऐवजी रूग्णांसाठी खाटा वाढवा, लसीकरण वाढवा, विलगीकरण कक्ष उभे करा असा आमचा आग्रह असून पायाभूत सुविधा वाढविणे हाच यावर पर्याय आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस