मुंबई : मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत नियमाचे पालन करा. मुंबईकरांनी नियमांचं पालन केलं नाही. त्यामुळे सरकारवर खापर फोडता येणार नाही लॉकडॉऊन पुन्हा केलेला आपल्याला परवडणारा नाही.त्यामुळे निर्बंध स्वतःहून पाळले पाहिजेत. मी ही लस घेतली आहे त्यामुळे माझा हात दुखतो आहे काळजी घेत आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
मुंबई पोलिसांच्या तोंडाला कोणी काळ फासलं असं विरोधी पक्षाने बोलू नये. विरोधी पक्ष हा संसदीय लोकशाही जिवंत ठेवतो पण असं बोलणं योग्य नाही. असं बोलणं विरोधी पक्षाच्या भूमिकेला, प्रतिष्ठेला प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे.असे देखील संजय राऊत म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस