मुंबई: औरंगाबादच्या नामांतरावरून वेगवेगळी मते येत आहेत. या मुद्द्यावर मी गेल्या आठवड्यातच बोललं होतो. राज्यात तीन पक्षाचे सरकार असल्याने या विषयावर एकत्र बसून चर्चा करूनच मार्ग काढू असं सांगतानाच मुख्यमंत्र्याच्या शासकीय ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. त्याची आम्ही शहानिशा करून त्यामागचे कारण शोधू, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
‘राज्यात अनेक निर्णय हे प्रशासकीय पातळीवर अधिकारी जाणीवपूर्वक घेत आहेत का? याबाबत चौकशी सुरू केली आहे. काही निर्णय मंत्र्यांना कळवले जातात का? याबाबत तपासणी सुरू आहे’. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.
‘ड्रेस कोड चा निर्णय कसा समोर आला याबाबत सर्व अनभिज्ञ होतो, असे निर्णय होताना तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घ्यावा असे ठरवलं. संभाजी नगर च्या बाबतीत, असं काही झालं का? हे तपासून पाहत आहे, कोणी जाणीवपूर्वक केलं का हे तपासणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
