मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. राजू पाटील यांनी संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.
गेले वर्षभर कोरोनासोबत लपंडाव खेळत होतो, पण तुर्तास कोरोनाच्या तावडीत सापडलोच ! गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास चाचणी करावी. कोरोना बरा होतो. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जोमाने कामाला लागेन, असे ट्वीट राजू पाटील यांनी केले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस