जोधपुर : अभिनेता सलमान खान याला काळवीट शिकार आणि आर्म्स अॅक्ट प्रकरणात जोधपूर हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सलमान खान याची कोर्टात वर्च्युअल उपस्थितीबाबत याचिका दाखल केली होती. अखेर याचिका मंजुर करण्यात आली असून सध्या त्याला हजेरीसाठी जोधपूर न्यायालयात येण्याची गरज नसेल.

सलमान खानने हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान 1998 मध्ये राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केली होती. त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर त्याला 6 दिवस जोधपूर तुरुंगात घालवावे लागले होते, त्यानंतर या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली होती.
या प्रकरणात सलमान खानला दोन वेळा जोधपूर तुरुंगात जावं लागलं आहे. सलमान खान व्यतिरिक्त तब्बू, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, आणि निलम यांच्यावरदेखील आरोप करण्यात आले होते.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
