सांगली: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. गोपीचंद पडळकर सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला.
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर पडळकर यांना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र आहे. जयंत पाटील राजारामबापूच्या जागेवर अनुकंपाच्या जागेवर गुणवत्ता नसताना राजकारणात आलेले आहेत, अशी खोचक टीका पडळकर यांनी केली.
जयंत पाटील राष्ट्रवादीतुन मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही. जयंत पाटलांना यूनोमध्ये वगैरे पाठवता येत का हे पवार साहेबांनी पाहायला पाहिजे. कारण ते फार बुद्धिमान आहेत, असा त्यांच्या पक्षाचा समज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता राज्यात आहे. पण भविष्यात दिसेल की नाही माहीत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
