नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीची घोषणा करण्यात आली असून जेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. साहित्य महामंडळाचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिक ठाले-पाटील यांनी याबाबत घोषणा केली. 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये 26, 27, 28 मार्चला होणार आहे.
नारळीकर यांच्या रुपाने पहिल्यांदाच एका विज्ञान लेखकाला साहित्य संमेलानाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. साहित्य मंडळ अध्यक्ष कौतिक ठाले-पाटील, मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या सह इतर पदाधिकारी बैठकीला हजर होते. अध्यक्षपदासाठी 9 दावेदारांच्या नावाची चर्चा होती. यामध्ये साहित्यिक भारत सासणे, जयंत नारळीकर, रामचंद्र देखणे, जनार्दन वाघमारे, तारा भवाळकर, अनिल अवचट, रवींद्र शोभणे, मनोहर शहाणे, गणेश देवी ही नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होती.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस