आटपाडी : 24 जानेवारी जागतिक बालिका दिनाचे औचित्य साधून जांभुळणी ता आटपाडी येथे महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गावातील १४ वयोगटावरील बालिका व महिलांची हिमोग्लोबिनचे चाचणी करण्यात आली. तसेच महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे अशा महिलांना लोहयुक्त गोळ्या व टॉनिकचे वाटप करण्यात आले. महिलांचा आरोग्य स्तर उंचावण्यासाठी ही मोहीम जांभुळणी गावात 24 जानेवारी ते 23 फेब्रुवारी या कालखंडात राबविला जाणार आहे.
याप्रसंगी आटपाडी पंचायत समितीच्या सभापती डॉ.भूमीकाताई बेरगळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ साधना पवार, आरोग्यवर्धिनी केंद्राच्या डॉ त्रिशला भोसले, सरपंच संगीता मासाळ, पोलिस पाटील अनिता पाटील व गावातील सर्व महिला उपस्थित होत्या.
या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी साधना पवार यांनी महिलांना त्यांचा हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. योग्य आहाराविषयी माहिती दिली व तालुक्यात महिलांसाठी ज्या आरोग्य योजना राबविल्या जातात, त्या संदर्भात मार्गदर्शन केले. सभापती भूमिका बेरगळ यांनी महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवाहन केले व लवकरच जांभुळणी गाव अनेमिया मुक्त गाव होईल अशी आशा व्यक्त केली.संपूर्ण तालुक्याने जांभुळणी गावाचा आदर्श घ्यावा व आपला संपूर्ण तालुका आनेमिया मुक्त व्हावा यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू अस त्या म्हणाल्या. सभापती भूमिका बेरगळ यांनी त्यांच्या फंडातून जांभुळणी गावात जलव्यवस्थापन साठी 2 लाख रुपये वॉटर ATM साठी देण्याचे घोषित केले याबद्दल शिवराम मासाळ यांनी त्यांचे आभार मानले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस