कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात गदारोळ असून येथील व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये मोदींच्या व्यासपीठावर ममता बॅनर्जी नाराज झाल्या आहेत. त्या भाषण न करताच परतल्या. ज्यावेळी ममता भाषणासाठी मंचावर गेल्या, तेव्हा काही लोकांनी जय श्रीरामचा जयघोष केला. यानंतर ममता माइकवर म्हणाल्या की, “हा एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. एखाद्याला आमंत्रण देऊन अपमान करणे ही चांगली गोष्ट नाही. मी आता काहीच बोलणार नाही. जय भारत, जय बांग्ला.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकात्यात दाखल झाले आहेत. येथे त्यांनी राष्ट्रीय ग्रंथालयाचा दौरा केला. यानंतर मोदी व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये पोहोचले, येथे ते नेताजींच्या स्मरणार्थ नाणे आणि टपाल तिकिट जारी करतील. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील पंतप्रधानांसोबत येथे उपस्थित आहेत. याआधीही एकाच कार्यक्रमात हजार असूनही दोघांनी एकमेकांशी संवाद साधला नाही.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस