नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत निधी वाटप आणि विकासकामांबद्दल माहिती दिली. तसंच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर जाहीर भाष्य केले.
महाविकास आघाडी सरकारने नियमानुसार 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार केली. ती यादी ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. पण महिने उलटले पण अजूनही राज्यपालांनी याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यपाल लवकरच नावं जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. ते आम्हाला कोर्टात जाऊ देणार नाही असं वाटतंय, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं.
तसंच, मुंबई लोकल सेवा सुरू झाली आहे. पण लोकलसाठी काही वेळा ठरवून दिल्या आहे. या वेळांबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्याचे कानी आले आहे. त्यामुळे मुंबई लोकलच्या वेळा आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन योग्य तो बदल केला जाईल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
‘दिल्लीच्या सीमेवर गेल्या 3 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने आता त्वरीत हस्तक्षेप करावा आणि आंदोलनावर तोडगा काढावा. कृषी कायदे रद्द करावी अशी मागणी करणे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. पण बऱ्याच दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे त्यामुळे मार्ग काढण्यासाठी दोन्ही बाजुंनी 2 पावले मागे सरकावी’, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं.
गुलाम नबी आझाद हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहे. त्यांच्या निरोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भावुक झाले होते. दोघांच्या जुन्या आठवणी आहे त्यामुळे भाऊक झाले. पण तोच भावुकपणा शेतकऱ्यांच्या बाबतीत असावा ही अपेक्षा होती, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
