मुंबई : कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, शुक्रवारी त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. अण्णा हजारे यांच्या या निर्णयावर सोशल मीडियावर शंका उपस्थित केली जात आहे.
दरम्यान,हंसल मेहता यांनी अण्णा हजारेंसाठी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अण्णा हजारे यांचे समर्थन देणं चूक होती असे अप्रत्यक्ष पणे म्हटले आहे. ‘मी ज्या प्रकारे अरविंद यांना पाठिंबा दिला होता त्याच विश्वासाने अण्णा हजारे यांचे समर्थन केले होते. मला या गोष्टीचे दु:ख झाले नाही. कारण आपण सर्वजण चूका करतो. मी सुद्धा सिमरन चित्रपट केला’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
