मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले असल्याचे संजय राऊत यांनी सामनातून सांगितले. मात्र यामुळे विरोधकांना गृहमंत्र्यांवर निशाणा साधण्यासाठी हाती आयते कोलित मिळाल्याचे दिसत आहे. यावरून भाजपकडून देशमुखांवर निशाणा साधला जात आहे.
अपघाताने मिळालेले, अपघातानेच संपेल असे दिसत आहे, अशा मोजक्याच शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना टोला लगावला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस