मुंबई : “महाविकासआघाडीने सर्व नैतिकता पायाखाली तुडवली आहे. केवळ सत्तेसाठी या ठिकाणी हे सर्व काम चाललं आहे. त्या पलीकडे काहीही नाही. काँग्रेसला किती हिस्सा आणि वाटा मिळतो हे देखील त्यांनी सांगावे. राज्यपालांना वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मौन हे त्याहून चिंताजनक आहे. मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यापालांनी बोलत करावं. खंडणीच्या घटनेत काय कारवाई केली? याबाबतचा अहवाल घेतला पाहिजे,” अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
“काल जो अहवाल दिला तो लवंगी फटका होता की मोठा बॉम्ब, हे लवकरच समोर आले. जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले? तसेच 25 ऑगस्ट 2020 पासून तो दाबून का ठेवला? यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. नेमकं कोण यात लिप्त आहेत म्हणून त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही तो दाबून ठेवला,” असा सवाल फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.
मुख्यमंत्री हे प्रमुख आहे. त्यांनी बोललं पाहिजे. पण त्यांना माहिती आहे की या मुद्द्यावर बोलणे कठीण आहे. पण त्यांना माहिती आहे की यावर बोललं तर याची चौकशी करावी लागेल. त्याची चौकशी त्यांना करायची नाही. सरकारला वाचवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत अधिकृत व्यक्ती नाही. ते काही सरकार व्यक्ती नाही. त्यांचे वक्तव्य सरकारचे अधिकृत मानले जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे फार वेळ आहे. ते काही एवढे मोठे नाहीत. की त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत,” असेही फडणवीस म्हणाले.
“जर कोणत्या अधिकाऱ्याने खरे सांगितले तर तो भाजपचा एजंट ठरतो आणि जर हफ्ता वसूली केली तर तो काय शिवसेनेचा एजंट आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस