मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वर्शी हिचा साखरपुडा रविवारी संपन्न झाला. या समारंभाला राजकीय वर्तुळातील अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही या समारंभाला आले होते. त्यावेळी संजय राऊत यांनी समारंभाच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस यांची गळाभेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांकडून संजय राऊत यांनी विचारणा करण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, महाराष्ट्रात कोणी एकमेकांची गळाभेट घेत नाही का? मी फडणवीसांची गळाभेट घेतली. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाची गळाभेट नव्हे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विचारधारेचे राजकीय नेते एकमेकांच्या घरी अशा समारंभांसाठी जात असतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळीही सर्व राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यामुळेच महाराष्ट्र हे संस्कृती आणि परंपरा असणारे राज्य म्हणून ओळखले जाते, असे संजय राऊत यांनी म्हटले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
