मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मालमत्ता कर वसुलीत 100 कोटींची तफावत असल्याचा काँग्रेसने ‘घरचा आहेर’ दिला असल्यामुळे तर पर्यावरण मंत्र्यांना कोविडची लागण झाली नाही ना?, असा सवाल अतुल भातखळखर यांनी केला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस