नवी दिल्ली : सर्वसामान्यांना महागाईने मोठा झटका दिलाय. घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. तेल कंपन्यांनी LPG सिलिंडरच्या किंमती जाहीर केल्यायत. हे दर प्रति सिलिंडर 25 रुपयांनी वाढवण्यात आलेयत. व्यावसायिक सिलेंडरचे दर सहा रुपयांनी वाढवण्यात आलेयत. याआधी कमर्शिअल एलपीजी सिलेंडर (19 kg) चे दर 190 रुपये प्रति सिलिंडर वाढवण्यात आलेयत.
घरगुती गॅस च्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाल्यानंतर दिल्लीत एलपीजीची किंमत 719 रुपये झालीय. आजपासून म्हणजेच 4 फेब्रुवारीपासून हे दर लागू झालेयत. डिसेंबरमध्ये IOC ने घरगुती गॅसच्या किंमती दोनवेळा वाढवल्या. कंपनीने 2 डिसेंबरला 50 रुपयांनी वाढ केली. त्यानंतर 15 डिसेंबरला 50 रुपये आणखी वाढवले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
