IND vs AUS, Adelaide 1st Test : ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताला केवळ ३६ धावात गुंडाळत तिसऱ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाने आपला विजय साजरा केला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 244 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 191 धावांवर रोखले. भारतीय संघ दुसऱ्या डावात 53 धावांच्या आघाडीसह मैदानावर उतरला होता. परंतु, दुसऱ्या डावात केवळ 36 धावा करता केल्या.
भारतीय संघाच्या कोणत्याही फलंदाजाला धावसंख्येचा दुहेरी आकडा गाठता आला नाही. मयांक अग्रवालने सर्वाधिक 9 धावा केल्या. तर हनुमा विहारीला 8 धावा करण्यात यश आलं. चेतेश्वर पुजारा, अजिंक रहाणे आणि आर अश्विनला भोपळाही फोडता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोस हेजलवूडने अवघ्या 8 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या तर पॅट कमिन्सला 21 धावा देऊन चार विकेट्स मिळविल्या व विजय साजरा केला.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस
