अहमदाबाद : इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत टीम इंडियाचा विकेटकीपर रिषभ पंतने शानदार शतक पूर्ण केले आहे. रिषभने आक्रमक खेळी करत अवघ्या 115 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केले.
रिषभ पंतचे कसोटी कारकिर्दीतील हे 3 रे शतक त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या बोलिंगवर सिक्स खेचत पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांचा त्याने चांगलाच समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस