जिनिव्हा : भारतात कोरोना लसीकरणाची तयारी सुरू होत असतानाच कोरोनाचं बदलतं रूप आणि जगातील परिस्थिती पाहता सध्या तरी जगात कुठेही हर्ड इम्युनिटीची शक्यता दिसून येत नाही. असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत WHO ने ही चिंता व्यक्त केली आहे.
WHO च्या डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या, “नुकतीच ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, इज्राइल आणि नेदरलँडसह अनेक देशांनी आपल्या नागरिकांचं लसीकरण सुरू केलं आहे. लस देऊन आपण कोरोनाचा जास्त धोका असलेल्या लोकांना सुरक्षा देऊ पण 2021 सालात आपण हर्ड इम्युनिटी विकसित करू शकत नाही. जर काही ठिकाणी किंवा देशांमध्ये असं झालं तरी जगभरातील नागरिकांना सुरक्षा मिळेल असं नाही.
तज्ज्ञांच्या मते, हर्ड इम्युनिटीसाठी जवळपास 70% टक्के लोकांचं लसीकरण आवश्यक आहे. यामुळे संपूर्ण लोकसंख्या कोरोनापासून सुरक्षित होईल. पण कोरोना जास्त संसर्गज्य आहे आणि हर्ड इम्युनिटीसाठी फक्त 70% ही पुरेसे नाहीत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर खबरदारी घ्यायलायच हवी. “
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
