बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर तिनं बलात्काराची केस मागे घेतली होती, तरीही समाज माध्यमांतून धनंजय मुंडेंविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या,यावर आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी या सर्व प्रकरणावर खुलासा केलाय.
”एखाद्या भगवंताचा प्रसाद असतो, तसे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, अशा कठीण प्रसंगामध्ये आपण सर्वांनी माझ्या पाठीशी साथ उभी केली. मी शब्दात आभार मानू शकत नाही. आपल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगावरील कातड्याची जोडे करून जरी आपल्याला घातली तरीही ती फिटू शकत नाही, असं धनंजय मुंडे म्हणालेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलताना भावुक झाले.
आजपर्यंत अनेक संकटाला सामोरे गेलो. सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करून आज इथपर्यंत पोहोचलो. जीवनामध्ये मी कोणाचेही मन दुखवून स्थान निर्माण केले नाही. मन जिंकून मी स्थान निर्माण केलंय”, असंही धनंजय मुंडेंनी अधोरेखित केलंय.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
