नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट देशामध्ये विस्तारू लागली आहे. अशावेळी दिल्ली हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कारमध्ये तुम्ही जरी एकट्याने प्रवास करत असाल तरी देखील मास्क वापरणे अनिवार्य असेल. यासंदर्भात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. दिल्ली हायकोर्टाने चारचाकी एक पब्लिक प्लेस म्हटले आहे, अशावेळी मास्क वापरणे अनिवार्य असेल.
दिल्ली उच्च न्यायालयाने यासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना असे म्हटले की, कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी मास्क एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. मास्क हा असा उपाय आहे ज्यामुळे लाखो लोकांचा जीव वाचला आहे, असे दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस