बारामती : शेतकरी आंदोलनावरुन अधिक काळ सुरु असलेल्या आंदोलनावरुन सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना आवाहन केलंय. शरद पवार यांचं आत्मचरित्र कृषी कायदे म्हणून लागू करा, आम्ही पाठिंबा देऊ, असं आवाहन रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केलंय.
2006 साली करार शेतीचा महाराष्ट्र सरकाने संमत केला. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची सुरुवात बारामतीपासून झाली. लोक माझे सांगती या शरद पवार यांच्या आत्मचरित्रात करार शेतीचा उल्लेख केला आहे. त्यांचं आत्मचरित्र कृषी कायदे म्हणून लागू करावं, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
