मुंबई : भाजपचे नेतेनारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. ‘अमित शहा यांना मी पत्रपाठवून मी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत माहिती दिली. ठाकरे सरकार राज्यातील परिस्थितीत हाताळण्यास अपयशी ठरत असल्याचं निदर्शनास आणून दिले असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भात मी मागणी केली आहे, ३ दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत मी अमित शहांना पत्र लिहिले आहे’, असंही नारायण राणेंनी सांगितले.
‘दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत या केसेस सचिन वाझेंनी हाताळल्या. सचिन वाझेंना या केसेसवर कुणाला तरी वाचवण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. आता सचिन वाझेंना अटक केली आहे. सचिन वाझेंची चौकशी मनसुख हिरेन केस बाबतच नाही तर याआधीच्या त्यांनी हाताळलेल्या केस बाबतही पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी राणेंनी केली.
‘शिवसेनेचा आसरा सचिन वाझेंना आहे. सचिन वाझेंच्या जीवावरच तर शिवसेनेवेकडून धमक्या दिल्या जातात. वाझेंची ज्याअर्थी मुंबईत पोस्टिंग होत होती. ते बघता वाझेंचे पोलीस खात्यातील गॉडफादरही आता बाहेर येत आहे’, अशी टीकाही राणेंनी शिवसेनेवर केली.
‘कसला आला आहे सामना. रमेश किणी प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरण काय संबंध आहे. काहीही उकरुन काढतात. तो काय पेपर आहे. थापा मारणारा पेपर आहे’, असा टोलाही राणेंनी सामनाच्या अग्रलेखवरून शिवसेनेला लगावला.
‘सध्या मातोश्रीची बाजू घ्यायलाच बघतात काहीतरी मिळेल, पदरात पडेल. म्हणून संजय राऊत यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही. राष्ट्रवादी, काँग्रेसचीही वाझे प्रकरणात नैतीक जबाबदारी आहे’, अशी टीकाही राणेंनी केली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस