पुणे : “महाराष्ट्रातील पुण्यासह वेगवेगळ्या राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे, तिथे धोरणात्मक बदल आवश्यक आहे. 18 वर्ष वयोगटावरील नागरिकांसाठी तात्काळ लसीकरण उपक्रम सुरु करण्यात यावा. त्यासाठी संबंधित राज्यांना अधिकाधिक लसी उपलब्ध करुन द्याव्यात” अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार करणार आहेत. अशा जिल्ह्यांमध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निती आयोगाच्या सदस्यांनी केल्याकडेही अजित पवारांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्रात 1 लाख 10 हजार 485 रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाबाधितांचा वाढता रुग्णांचा पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यू किंवा कडक निर्बंध लावले जात आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस