मुंबई : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केल्याची माहिती आहे.’रामाच्या नावानं काही लोक घरोघरी पोहचत आहेत. पण पैसे मागण्यासाठी, आपल्याला तसं करायचं नाहीय. ”देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो”. माझ्यापर्यंत तळागाळातला माणूस हा तुमच्यामार्फत माझ्यापर्यंत पोहचला पाहिजे. बाबरी मशिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती. आता भाजप पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचं पुढे आलं आहे.

‘नेपाळ आणि श्रीलंकेत सत्ता स्थापन करणार असं म्हणतात. हिम्मत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा. मग आम्ही तुमचं स्वागत करु. पाकिस्तानमध्ये भगवा फडकवा, आम्हाला आनंद होईल. आरएसएस स्वातंत्र्य संग्रामात कुठेही नव्हती. दुस-या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. पण त्यावेळी शिवसेनेनं निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानं आपले लोक भाजपमध्ये गेले, नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती पण भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
