नाशिक : अमेरिकेत निवडणुकीतील पराभवामुळे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले पद सोडावे लागले. तर डेमोक्रेटिक पक्षाच्या जो बाइडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची नुकतीच शपथ घेतली. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी माझं ऐकलं असतं तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, अशी शाब्दिक टोलेबाजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
अमेरिकेच्या राजकारणावर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी दादागिरी, गुंडगिरी केली हा लोकशाहीला कलंक आहे. अमेरिकेत माझा रिपब्लिकन पक्ष हरल्याचं दुःख आहे. ट्रम्प यांनी माझं ऐकलं असतं तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. आठवलेंनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बाइडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे देखील अभिनंदन केले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
