मुंबई : वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्र्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेशी समाजमाध्यमाद्वारे संवाद साधला.कोरोना संसर्गाचे प्रमाण थोडे कमी झाल्यावर आपण गाफील राहिलो, पण त्याने पुन्हा डोके वर काढले. उपनगरी रेल्वे, उपाहारगृहांमध्ये गर्दी होत आहे. घरगुती कार्यक्रमांनाही मोठी गर्दी होत आहे. परिणामी, करोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. ती अशीच वाढत राहिली तर रुग्णालये तुडुंब ड्टारतील. त्यामुळे अनावश्यक गर्दी आता टाळावीच लागेल, असे आवाहन राज्यातील जनतेशी समाजमाध्यमाद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी केले. टाळेबंदीची लगेचच घोषणा करत नाही. पण दोन दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आली नाही आणि टाळेबंदीला पर्याय सापडला नाही तर टोकाचे पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यात विलगीकरण कक्षांतील ६२ टक्के खाटा ड्टारल्या आहेत. अतिदक्षता विभागातील २० हजार ५१९ खाटांपैकी ४८ टक्के खाटा ड्टारल्या आहेत. आपण आरोग्य सुविधा वाढवत आहोत, पण डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी कु ठून आणायचे, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
लस घेतली म्हणजे करोना संसर्ग होणार नाही असे नव्हे. लशीमुळे करोना संसर्गाची तीव्रता कमी होते. त्यामुळे मुखपट्टी, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात धुणे या प्रतिबंधात्मक उपायांना पर्याय नाही, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. गुरुवारी एका दिवसात ३ लाख लोकांचे लसीकरण केले. आपल्याला ती क्षमता ६ लाखांपर्यंत न्यायची आहे. त्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे, असेही ते म्हणाले.
टाळेबंदीच्या संदर्भात किंवा मुखपट्टी लावण्यावरून मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्योगपती आनंद महिंद्र, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींना चांगलेच सुनावले. टाळेबंदीऐवजी आरोग्य सुविधा वाढवा असा सल्ला एका उद्योगपतीने दिला. टाळेबंदी खपवून घेणार नाही, लोकांची रोजीरोटी बुडेल त्याचे काय, अशी वक्तव्ये विरोधी पक्षातील नेत्यांनी केली आदी दाखले देत मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना फटकारले. आरोग्य सुविधा वाढवण्याचे काम सुरूच आहे, पण मग तुम्ही रोज ५० डॉक्टर, परिचारिका आणून देणार का, असा सवाल करत त्या सूचनेतील फोलपणा ठाकरे यांनी दाखवून दिला. तर रोजी रोटी वाचवायचीच आहे, पण त्याआधी लोकांचा जीव वाचवायचा आहे. लोकांच्या जिवावर बेतणारे राजकारण करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले. तसेच काही जण मुखपट्टी वापरत नाहीत, ती वापरणार नाही, असे सांगतात याबद्दल नाराजी व्यक्त करत असे बोलण्यात तुम्हाला खूप शूरपणा वाटतो का, टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी येत्या सोमवारपासून कठोर निर्बंध लागू केले जातील. सरसकट टाळेबंदी लागू केली जाणार नाही, असे संकेत सरकारीमधील उच्चपदस्थांनी दिले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मंत्री आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडून सायंकाळी झालेल्या बैठकीत आढावा घेतला. काँग्रेसने सरसकट टाळेबंदीला विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादीचाही विरोध आहे. यामुळे सरसकट टाळेबंदी लागू केली जाणार नाही.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस