मुंबई : मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला. सरकारच्या चुका लक्षात आणणं हे विरोधकांचे काम आहे. जर आमचं म्हणणं योग्य असेल तर आर.आर. पाटील हे संबंधितांवर ताबडतोब कारवाई करायचे, अशी आठवण बाळा नांदगावकर यांनी सांगितली.
ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांनी राजीनामा देऊन सत्याचा स्वीकार करायला पाहिजे, असा सल्ला दिला. या कारणावरून सभागृहाचे कामकाज बंद पाडणे योग्य नाही. विधानसभेत केवळ मुकेश अंबानी आणि सचिन वाझे यांच्यावर चर्चा होते. लोकहिताच्या प्रश्नांवर काम होत नाही, अशी टीका बाळा नांदगावकर यांनी केली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस