मुंबई : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्रावर दौऱ्यावर येऊन गेले. ‘आपण जे काही राज्यात राजकारणात करायचं ते छातीठोक करतो, सेनेला आपण कोणतेही वचन दिले नव्हते, उलट त्यांनी फसवले. भाजप साखर कारखानदारांना कोण धमकावत असेल तर घाबरत नाही, ज्या वेळेस मुख्यमंत्री फडणवीस होते, त्यांनी जर तशा स्वरूपाचे वागले असते तर शिवसेना राहिली नसती’ असे वक्तव्य केल्यानंतर राज्यात परत एकदा ऑपरेशन लोटस होणार का? ही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमित शहांच्या विधानाचा समाचार घेत जोरदार पलटवार केला आहे. तसेच, जर ऑपरेशन लोट्स झाले तर राज्यात भाजपच राहणार नाही’ अशी टीकाही पटोले यांनी केली.
विरोधी पक्ष नेते फडणवीस हे माझे चांगले मित्र आहेत, पण ते काहीही बोलतात. त्यांचं बोलणं हीच त्यांची फक्त खासियत आहे. पण त्यांनी पुढे पत्रिका दाखवली आहे का? ती राज्यात भाजप सरकार येईल कारण ते कदाचित जास्त पत्रिका पाहतात, अशी कडवट टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे. तसंच, अमित शहा यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का? असा टोलाही त्यांनी लगावला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
