मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यांवर निशाणा साधला आहे. तसंच, भाजपनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेका घेतला आहे, अशी बोचरी टीका पटोले यांनी केली आहे. परमबीर सिंह यांच्या बदलीसंदर्भात पटोले यांनी प्रश्न विचारले असता त्यांनी, मी जर सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंह यांची बदली केली नसती त्यांना निलंबीतच केलं असतं, असं म्हणाले आहेत.
‘मी जर सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंह यांना निलंबित केलं असतं. मुंबईसारख्या संवेदनशील ठिकाणी या पद्दतीने वागणारे अधिकारी असतील तर मी बदली केली नसती निलंबितच केलं असतं, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
‘अधिकाऱ्यांनी कोणाची बाहुली बनू नये. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. फडणवीसांनी रश्मी शुक्लांचा उल्लेख केला. आता या पद्धतीच्या अधिकाऱ्यांचा वापर भाजप करत असेल तर ही गंभीर बाब आहे. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही,’ असं नाना पटोले म्हणाले.केंद्राचा दबाव आणून आयपीएस अधिकाऱ्यांचा वापर केला जातोय, असा आरोप पटोले यांनी केला आहे.