मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत सध्या सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. कंगनाच्या आगामी ‘धाकड’ या चित्रपटाचं मध्य प्रदेशमध्ये चित्रीकरण सुरु आहे. याच काळात तिने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दहशतवादी असा उल्लेख केला होता, त्यामुळे तिने शेतकऱ्यांची माफी न मागितल्यास हे चित्रीकरण बंद करु अशी भूमिका मध्य प्रदेशच्या काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे.

“कंगनाने देशातील शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून संपूर्ण देशामधील शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे तिने माफी मागितली पाहिजे”, असं म्हणत मनोज आर्य आणि नेकराम यादव यांनी बेतूल येथील तहसीलदार कार्यालयात निवेदन दिलं आहे.
कंगनाने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा उल्लेख दहशतवादी असा केला होता. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर कंगनावर टीकेची झोड उठली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
