• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

“असा औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर हे वागणं..” : शिवसेना

tdadmin by tdadmin
January 17, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

मुंबई : औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावरुन शिवसेनेनं काँग्रेसला टोला लगावलाय. सामनाच्या अग्रलेखातून नामांतराच्या भूमिकेचं पुन्हा एकदा समर्थन केलंय. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी संभाजी महाराजांवरच प्रेम करावे अशी माझी भूमिका आहे, मी काँग्रेसवर हल्ला केलेला नाही असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिलंय.

औरंगजेब सेक्यूलर अजिबात नव्हता. त्याचा संबंध संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला. औरंगजेबाच्या आदेशावरुनच संभाजीराजांना हालहाल करुन मारण्यात आले आणि त्यांचा छन्नाविच्छिन्न देह बेवारस अवस्थेत फेकून देण्यात आल्याचा दाखला सामनातून देण्यात आलाय. राज्यातील सर्वच पुढाऱ्यांनी संभाजी राजांचा इतिहास पुन्हा वाचायला हवा. असा औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर हे वागणं सेक्युलर नव्हे असा टोला सामनातून कॉंग्रेसला लगावण्यात आलाय.

औरंगजेब हा क्रूर शासक होता, त्याला इतर धर्माविषयी प्रेम नव्हते, अश्या राजाच्या नावाविषयी महाराष्ट्रात काय देशात देखील कोणी आग्रही असू नये, ही शिवसेनेची भूमिका असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे संभाजी नगर हे नाव आम्ही दिले असून त्यावर आक्षेप असू नये. यात मुस्लिम किंवा हिंदू व्होट बँकेच्या प्रश्न येत नाही. याच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अस्मितेचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जरी असले तरी त्यांच्याइतका सेक्युलर राजा या जगात झाला नाही, तसेच छत्रपती संभाजी राजे देखील आहेत असे राऊतांनी म्हटले.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Tags: #sanjayravut#Shivsena
Previous Post

सोलापूर जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव ; मंगळवेढा तालुक्यात बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू

Next Post

‘दलित पँथर चळवळ आमचे प्रेरणास्थान : सोमनाथ भोसले ; आंबेडकर चळवळीमध्ये योगदान दिलेल्या पँथर पदाधिकाऱ्यांचा सन्मान

Next Post

‘दलित पँथर चळवळ आमचे प्रेरणास्थान : सोमनाथ भोसले ; आंबेडकर चळवळीमध्ये योगदान दिलेल्या पँथर पदाधिकाऱ्यांचा सन्मान

एकूण वाचक

  • 141,542

ताज्या बातम्या

अपघात टळणार : 1 एप्रिलपासून देशातील सर्व कारमध्ये दोन्ही आसनांसाठी एअरबॅग अनिवार्य

अपघात टळणार : 1 एप्रिलपासून देशातील सर्व कारमध्ये दोन्ही आसनांसाठी एअरबॅग अनिवार्य

March 6, 2021
“या” शिवसेना आमदारांच्या कुटुंबातील १२ सदस्यांना कोरोनाची लागण

“या” शिवसेना आमदारांच्या कुटुंबातील १२ सदस्यांना कोरोनाची लागण

March 6, 2021
बाँबस्फोट की प्राणघातक हल्ला? : बाँबस्फोट धमाक्यात भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी

बाँबस्फोट की प्राणघातक हल्ला? : बाँबस्फोट धमाक्यात भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी

March 6, 2021
“सामान्य जनतेचा कडेलोट करायचा की दिलासा द्यायचा, यापैकी एक पर्याय मोदी सरकारला निवडावाच लागेल” : शिवसेना

“सामान्य जनतेचा कडेलोट करायचा की दिलासा द्यायचा, यापैकी एक पर्याय मोदी सरकारला निवडावाच लागेल” : शिवसेना

March 6, 2021
आता अशापद्धतीने देखील होणार कोरोना लसीकरण ; चार ठिकाणी चाचणी सुरू

आता अशापद्धतीने देखील होणार कोरोना लसीकरण ; चार ठिकाणी चाचणी सुरू

March 6, 2021
“अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी, सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?” : चित्रा वाघ

“अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी, सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?” : चित्रा वाघ

March 6, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143