वर्धा : सगळे पाठिंबा देणारे पक्ष जर उपमुख्यमंत्रीपद मागत असतील तर अपक्षाला का देऊ नये, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलाय. सोबतच अपक्षाला ही उपमुख्यमंत्री पद देत एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री करावं आणि एक वाढवत चार उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री अस पाच होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री कडू यांनी व्यक्त केली. ते वर्धा येथे बोलत होते.
आज संपूर्ण देशात शेतकऱ्यांच आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्याच्या आंदोलनाकडे असच दुर्लक्ष केलं तर उद्रेक होईल, असंही कडू म्हणाले. या आंदोलनाला दोन महिन्यापेक्षा अधिक वेळ झाला आहे. हे आंदोलन देशातल सर्वात मोठं आणि सर्वात जास्त संख्येत असलेलं आंदोलन आहे. मोदी सरकार ज्या पद्धतीन शेतकऱ्यांवर वचपा काढण्याच्या पद्धतीने वागत आहेत हे चुकिच आहे. कायदा मागे घेतल्यावर नुकसान काय होईल, कोणाच्या तिजोऱ्या कमी होतील हे मोदींनी स्पष्ट करावं असेही ते म्हणाले.
कायदे मागे घेतल्यान शेतकऱ्यांच काहीच नुकसान होणार नाही तर होणार कोणाचं नुकसान हे स्पष्ट करावं. नुकसान काहीच होत नसेल तर कायदा मागे घ्यायला अडचण काय आहे हा ही प्रश्न आहे. मला असं वाटत की सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत पाहू नये , आपण त्या शेतकऱ्यांच्या मतदानावर भूलथापा देऊन दोन वेळा निवडून आले आहे, अस आता चालणार नाहीय. असच चालू राहील तर त्याचा उद्रेक होईल, हे मात्र निश्चित आहे अशी प्रतिक्रिया दिलीय.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
