मुंबई : शिवसेनेचे नेते हरीभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून संजय राठोड यांच्याजागी मला वनमंत्री पद द्या अशी मागणी केली आहे. हरीभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना दोन पत्र लिहिली असून भेटीसाठी वेळ मागितला आहे.
हरीभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना ७ मार्च रोजी पहिलं पत्र लिहिलं आहे. तसेच हरीभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी दहा मिनिटांचा वेळ मागितला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या वनमंत्री पदी बंजारा समाजाचे नेते म्हणून आपल्याला संधी द्यावी अशी मागणी या पत्रामध्ये हरीभाऊंनी मुख्यमंत्र्यांकडे की आहे. “वंचित घटकाला मुख्यमंत्री नक्की न्याय देतील असा मला विश्वास आहे. तसेच संधी मिळाल्यास आपण विदर्भामध्ये शिवसेनेला पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्याचा प्रयत्न करु. याचसंदर्भात राजकीय चर्चा करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला असून ते नक्की वेळ देतील,” अशी प्रतिक्रिया हरीभाऊ राठोड यांनी व्यक्त केलीय.
“तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते. त्यामुळे आता वनमंत्रीपद मला द्यावे,” असं हरीभाऊ यांनी पत्रात म्हटलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस